कुठल्याही प्रमाणपत्रासाठी आता बाँड पेपरची गरज नाही
प्रतिनिधी । औरंगाबाद शाळा - महाविद्यालये सुरू झाली की आधार सेंटर , सेतू सुविधा केंद्रावर जात , उत्पन्न , वास्तव्य , नॉन क्रीमी लेअर , राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी , पालकांची गर्दी होते . यासाठी शासकीय कार्यालय आणि न्यायालयात मुद्रांक शुल्क आकारले जाते . त्या माध्यमातून शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून दिले जाते . मात्र , आता हे अॅफिडेव्हिट ( प्रतिज्ञापत्र ) करण्याची गरज नाही . औरंगाबाद , जालना आणि बीड जिल्ह्यातल्या मुद्रांक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना तशा सूचना दिल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी दिली . शाळा - महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक प्रमाणपत्रे लागतात . अनेकदा वडिलांच्या नावावर असलेली प्रमाणपत्रे मुलांना काढण्यासाठी , आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी बाँड पेपरचा वापर केला जातो . २००४ पासून याबाबत शासनाने आदेश काढले होते . मात्र , काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती . आता या कागदपत्रांसाठी वायाळ यांनी सांगितले की , कुठल्याही शासकीय कार्यालयात शासकीय कामकाजाकरिता आणि विद्याथ्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क ( स्टॅम्प पेपर ) शासनाने यापूर्वीच माफ केले आहे . तशी प्रसिद्धीही राजपत्रात केली आहे . तिन्ही जिल्ह्यांतल्या शासकीय कार्यालयांतील ... तर विद्यार्थी , लोकांचे सर्व पैसे वाचतील औरंगाबादच्या सेतूमध्ये हे प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वयंघोषणापत्रच घेतले जाते . मात्र , ग्रामीण भागात तसेच इतर जिल्ह्यात बाँड पेपर वापरला जातो . त्यामुळे शंभर रुपयांचा पेपर तसेच नोटरी करण्यासाठी पुन्हा शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो . त्यामुळे हे स्वयंघोषणापत्र लिहून दिल्यास विद्यार्थी , लोकांचे सर्व पैसे वाचतील ,मुद्रांक विक्रेत्यांना कळवण्यात आले आहे . त्यामुळे या कागदपत्रांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे साध्या कागदावर लिहून सादर करता येतील . त्यासाठी प्रतिज्ञापत्र बाँड पेपरवर देण्याची गरज नाही . अशा कामासाठी बाँड पेपर देऊ नये , अशा सूचना मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत .बाँडवर प्रतिज्ञापत्राची मागणी करू नये शासकीय कार्यालयात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रतिज्ञापत्राची मागणी करू नका . याबाबत तहसीलदार , मुद्रांक जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले आहे . प्रमाणपत्रासाठी केवळ स्वयंघोषणापत्र कागदावर लिहून देणे गरजेचे आहे . त्यासाठी बाँड पेपरची गरज नाही . - सोहम वायाळ , नोंदणी उपमहानिरीक्षक
0 Comments