सांगलीत बापा कडूनच मुलाचा खुन ओळख लपविण्यासाठी सांगोला येथील तलावात टाकला होता मृतदेह
सांगली , दि . २७ ( प्रतिनिधी ) मिरज तालुक्यातील कवलापूर येथील विजय विकास पवार ( वय २१ ) या युवकाच्या खून प्रकरणाचा उलघडा करण्यात सांगली ग्राम ीण पोलिस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे . वारंवार आई - बापाला विनाकारण त्रास देत असल्याच्या रागा तूनच बापानेच आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने त्याचा खून केला . त्याच्या मृतदेहाची ओळख पटू नये , यासाठी तो सांगोला ( जि . सोलापूर ) येथील तलावात टाकला होता . याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे . अटक केलेल्यात त्या मुलाचा बाप विकास बाबू पवार ( वय ४५ , रा . कवलापूर , ता . मिरज , जि . सांगली ) व त्याचा सहकारी उत्तम मदने ( वय २८ , रा . कोळे , ता . सांगोला ) या दोघांचा समावेश आहे . हा गुन्हा पुढील तपासकामी सांगोला पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे . पोलिस अधीक्षक दिक्षीत कुमार गेडाम , अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले व सांगली शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलिस ठाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार , हवालदार बाळकृष्ण गायकवाड , रमेश कोळी , कपिल साळुखे , महेश जाधव व आकाश गायकवाड यांच्या पोलिस पथकाने या खुनाचा उलघडा केला . सांगोला पोलिस ठाणे हद्दीत दि . १५ जुलै रोजी सोपान जनार्दन गडदे यांच्या शेतालगत बंदेहाळ तलावात एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता . या मृतदेहाचे तीक्ष्ण हत्याराने डोके कापून "पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने डोके नस लेले खांद्यापासून खाली भाग असलेला मृतदेह तल वात टाकून देण्यात आला होता . याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात या खुनाचा शोध सुरु होता . याच काळात कवलापूर येथील एक युवक काही दिवसा पासून गायब असल्याची माहिती प्रशांत निशानदार व त्यांच्या पथकाला मिळाली होती . त्याआधारे या पथकाने तपास केला असता विजय विकास पवार याचा खून झाल्याचे सामोरे आले . त्या अनुषंगाने त्याच्या घरी जाऊन वडिल विकास पवार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे आली . त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करता त्यांनी आपल्या सहकारी मित्राच्या मदतीने स्वतःच्या मुलाचाच काटा काढल्याची कबुली दिली .
0 Comments