google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण

Breaking News

सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण

 सांगोल्यात मॉर्निक वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण 


सांगोला : दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेली जमीन घेतलेल्या बाजारभावाप्रमाणे परत द्या म्हणत चौघांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सराफाचे अपहरण केले . एवढ्यावरच न थांबता त्यांनी सराफाला एका खोलीमध्ये डांबून ठेवून मारहाण करून खिशातील मोबाईल काढून घेतला . ही घटना सोमवारी पहाटे ५:३० च्या सुमारास सांगोला - वासैद रोडवर घडली . दरम्यान , पोलिसांनी सतर्कता बाळगून अपहरणकर्त्याच्या तावडीतून सराफाची सुखरूप सुटका केली . याबाबत , सराफ व्यावसायिक जितेंद्र महादेव जाधव रा . शिवाजीनगर , सांगोला यांनी फिर्याद दिली . पोलिसांनी कल्याण शिवाजी बाबर , सोमनाथ कल्याण बाबर , अभिषेक कल्याण बाबर , संजय दिवसे आलेगाव , ता.सांगोला ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला . जितेंद्र महादेव जाधव यांनी १० वर्षांपूर्वी आलेगाव येथील कल्याण बाबर यांच्याकडून २० गुंठे शेतजमीन १० हजार रुपये गुंठा याप्रमाणे घेतली होती . दरम्यान , गेल्या ७ महिन्यापूर्वी जितेंद्र जाधव हे या प्लॉटमधील दोन गुंठे जमीन विक्री करण्यासाठी नाना भालके ( रा . केदार मळा ) यांना प्लॉट दाखवण्यासाठी गेले होते . यावेळी कल्याण बाबर यांनी जितेंद्र जाधव व नाना भालके यांना शिवीगाळ करून गटात यायला विरोध केला . दहा दिवसापूर्वी कल्याण बाबर , सोमनाथ बाबर व अभिषेक बाबर हे जितेंद्र जाधव यांच्या दुकानात येऊन घेतलेल्या किमतीमध्ये जमीन विकत द्या म्हणत दम दिला होता . जितेंद्र जाधव हे सोमवारी पहाटे ५ : ३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे वासूद रोडने मॉर्निंग वॉकला निघाले आणि अपहरण झाले . दरम्यान , अपहरणाची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर , हवालदार आप्पासाहेब पवार यांनी त्यांचा पाठलाग केला आणि डांबून ठेवलेल्या घराचा दरवाजा उघडून सुखरूप सुटका केली .

Post a Comment

0 Comments