google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लस घेतल्यानंतर ' ही ' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका ;

Breaking News

लस घेतल्यानंतर ' ही ' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका ;

 लस घेतल्यानंतर ' ही ' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका ; 


डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे . गेल्या 24 तासांत कोरोनाचे 39,361 नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर 416 जणांचा मृत्यू झाला आहे . कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,20,967 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे . काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे . याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरू आहे . लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे . मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे . निष्काळजीपणामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे .लस घेतल्यानंतरही कोणती लक्षणं आढळून येतात . यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया . डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे . कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना वाटतं संसर्ग होत नाही . मात्र असं काही नाही . लागण होऊ शकते . कोरोना लस घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे . कोरोनाची लस घेतल्यानंतरही घशात खवखव होणं , वास न येणं , डोकेदुखी , शिंका येणं अशी काही लक्षणं आढळून येत असल्याचं दिसून येत आहेत . कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे .घरी राहून स्वत : ची काळजी घ्या , गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका . सोशल डिस्टंसिंगचं पालन करा . आपले हात साबण आणि सॅनिटायझरच्या मदतीने नेहमी स्वच्छ करत राहा . बाहेरून घरी आल्यानंतर अंघोळ करा . सार्वजनिक ठिकाणी , दुकान , मॉल , ऑफिसमध्येही कोरोना नियमावलीचं पालन करा , लहान मुलांची विशेष काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे . एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे . फायजर - बायोएनटेक लसीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अँटीबॉडी आणि टी - सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचं ब्रिटीश संशोधकांनी म्हटलं आहे . रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे .ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम , न्यू कॅसल , लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन कोरोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर - बायोएनटेकच्या लसीबाबत सखोल संशोधन करण्यात आले . आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार , टी सेल आणि अँटीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचं संशोधकांना आढळून आले आहे . जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार , लसीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात कोरोनापासून बचाव होतो आणि लसीच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे . शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ . तुषाण डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार , सार्स - सीओव्ही -2 लसीनंतर अँटीबॉडी आणि टी - सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले . या संशोधनात 503 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता .

Post a Comment

0 Comments