सोलापुरकरांनो ! सोमवारपासून दुकानाच्या वेळेत बदल ?
आयुक्तांनी काढला आदेश ;सोलापूर शहरात 26 जुलै सोमवार पासून व्यापाराच्या वेळेत बदल होईल अशी चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी सायंकाळी नवे आदेश काढले आहेत.पूर्वीच्या आदेशाला मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे सोलापूरकरांची अनलॉक ची आशा धूसर झाली आहे . त्यामुळे कोणत्या सिनेमात बदल झालेले नसून पूर्वीप्रमाणेच दुकानाची वेळ राहणार आहे . ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८ ९ ७ च्या खंड २ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे . सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ ( १ ) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे .ज्याअर्थी संदर्भ क्र . १० च्या शासन मान्यतेने सोलापूर महानगरपालिका क्षेत्र हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्यास मान्यता मिळाल्याने तसेच मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र . २५ यास अनुसरुन कोविड -१ ९ चे विषाणू डेल्टा प्लस या व्हेरिएंट मध्ये करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात लेव्हल -३ चे निर्बंध लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे . त्याअर्थी , मी , पि शिवशंकर , भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका , सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी दिनांक २७/०६/२०२१ रोजीचे आदेश व दिनांक २८/०६/२०२१ रोजीच्या शुध्दीपत्रकातील आदेशच दि . २६/०७/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत आहे .सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल . अशा व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी .
0 Comments