google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ; फोन करून भावाला बोलाविला ; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला

Breaking News

धक्कादायक ; फोन करून भावाला बोलाविला ; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला

 धक्कादायक ; फोन करून भावाला बोलाविला ; भाऊ येईपर्यंत झाडाला फास घेतला


 बार्शी : माझ्या पोटात दुखत आहे , मी दारू पिलो आहे , तरी मला न्यायला ये , असे फोन करून भावाला सांगून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली . महेश प्रकाश शिंदे ( वय ३२ , रा . तळेवाडी , सुभाष नगर , बार्शी ) असे त्याचे नाव आहे . सदरची घटना बार्शी शहरात घडली . महेश शिंदे याचे कपड्याचे दुकान व गॅरेज आहे . ही दुकाने भाऊ अशोक आणि महेश चालवतात . अशोकला महेशने फोन करून बोलावले . थोड्या वेळाने अशोक महेशला आणण्यासाठी गेला . कॅन्सर हॉस्पिटलच्या आसपास इकडे तिकडे पाहिले असता तो दिसला नाही .रस्त्यावरून ये - जा करणाऱ्यांकडेही माझा भाऊ दिसला का अशी अशोकने रस्त्यावर विचारणा केली . तास दोन तास इकडे तिकडे त्याचा शोध घेत असताना कॅन्सर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने महेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले . भाऊ अशोक शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली .

Post a Comment

0 Comments