मोठी बातमी ; सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागविले - निवृत्त अधिकारी , कर्मचाऱ्यांना काम मिळणार
सोलापूर : ई - वर्गातील संस्था ज्यांचे २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक होणार घेण्यात येणार आहे . यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका ( पॅनल ) तयार करण्यासाठी शासकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी शुक्रवारी दिली . शासकीय विभागातील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कार्यरत अधिकारी , कर्मचारी ( वरिष्ठ लिपीकपेक्षा जादा दर्जा असलेले ) , प्रमाणित लेखापरीक्षक , पाच वर्षांचा अनुभव असलेले वकील , ६५ वर्षांपेक्षा जास्त वय नसलेले निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना अर्ज करता येणार आहे . अर्जाचे नमुने १५ जुलै ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत उपलब्ध होतील . विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था , पुणे , जिल्हा उपनिबंधक , पुणे शहर , साखर संकुल , शिवाजीनगर , पुणे , जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था , ग्रामीण , महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इमारत , पहिला मजला ५ , बी . जे . रोड , पुणे . जिल्हा उपनिबंधक , सोलापूर येथे अर्जाचे नमुने कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत . अर्जदारांनी अर्ज २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था , पुणे विभाग , पुणे यांच्या कार्यालयात वेळेत सादर करावेत , असे आवाहन भोळे यांनी केले आहे
0 Comments