संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
महूद,ता.26 : कोरोना महामारी च्या काळात प्रशासकीय यंत्रणा व सामाजिक क्षेत्रातील असंख्य व्यक्तींनी समर्पित भावनेने काम केलेले आहे.अशा समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे,असे विचार सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी महूद येथे बोलताना व्यक्त केले.महूद येथील संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महूद परिसरामध्ये कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा नुकताच सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे या होत्या.कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय शिंदे,अश्विनी हॉस्पिटलचे संचालक अशोक लामतुरे ),राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष रामचंद्र कबाडे, माजी ग्रामपंचायत सदस्या पारूबाई कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये सरपंच संजीवनी लुबाळ,उपसरपंच महादेव येळे,सकाळचे बातमीदार उमेश महाजन,सांगोला जनमत न्यूज चे रविंद्र कांबळे,पुण्यनगरीचे बातमीदार वैभव काटे,तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आत्माराम कोळी,तलाठी गणेश भुजबळ,पोलीस पाटील प्रभाकर कांबळे,आरोग्य सेविका रंजना व्हनमाने,माधुरी सावंत, पोलीस कर्मचारी अभिजीत मोहोळकर,डॉ.अमोल कांबळे, कैलास हिप्परकर,बाळासाहेब राजगुरू,सुधाकर कांबळे,अशोक कांबळे,मधुकर कांबळे,किरण डांगे, कैलास हिप्परकर यांना कोरोना योद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये या बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश कांबळे यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.कोरोना महामारी च्या काळात महूद परिसरात अनेक दुःखदायक घटना घडल्या आहेत.मात्र या संकटाची दाहकता कमी करण्याकरिता शासन-प्रशासन, येथील अधिकारी,पदाधिकारी यांच्यासह पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठे काम केले आहे. त्यांचा सन्मान आम्ही कर्तव्य म्हणून करीत आहोत,असेही ते म्हणाले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष खडतरे,अनिल डांगे,राजेश साळुंखे,लखन कांबळे,नागेश कांबळे,रतिलाल बनसोडे,रघवेंद्र चाबुकस्वार आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments