गुरुजीला आत्महत्या करायला लावणारा संशयित मोबाईलच्या लोकेशनवरुन सापडला करमाळा : गुळसडी येथील शाळेतील शिक्षक बळीराम वारे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला संशयित मोबाईलच्या लोकेशनवरुन सापडला
करमाळा : गुळसडी येथील शाळेतील शिक्षक बळीराम वारे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन अटक केली . शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली करमाळा येथील गणेश नगरमध्ये राहणार शिक्षक वारे हे गुळसडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते . या गावात जमिनीचा १४ लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार होऊनही जमिनीचा कब्जा न देता रमेश मोहन यादव व हनुमंत बागल दमबाजी करत होते . त्यांच्या त्रासाला कंटाळन सहशिक्षक बळीराम वारे यांनी २२ जुलैला पहाटे आत्महत्या केली . < आत्महत्येपूर्वी वारे यांनी या आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती . त्यानुसार या दोघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला होता . गुन्हा दाखल झाल्यावर सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी संशयित आरोपीचा शोध घेतला , पण दोघे घरी नव्हते . त्यानंत मोबाइल लोकेशन तपासले . त्यापैकी . यादवचे ठिकाण सापडले . पोलिसांनी त्यास तत्काळ पकडून अटक केली . शुक्रवार ( ता . २३ ) रोजी संशयितास न्यायालयात न्यायाधीश शिवरात्रे यांच्यासमोर हजर केले असता , या आरोपीस २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे .
0 Comments