google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खा.निंबाळकरांना भाजप देणार मोठी जबाबदारी ?

Breaking News

खा.निंबाळकरांना भाजप देणार मोठी जबाबदारी ?

 खा.निंबाळकरांना भाजप देणार मोठी जबाबदारी ?पश्चिम महाराष्ट्र पक्ष संघटनेमध्ये खा. निंबाळकरांनी लक्ष घालावे, अमित शहा यांची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करताना खा.नाईक -निंबाळकर


केंद्रीय मंत्रिमंडळात अखेरच्या क्षणी संधी हुकलेल्या खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खा.निंबाळकर यांना प.महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता लक्ष घालावे अशी सूचनाही केली आहे.


खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील आढावा यावेळी अमित शहा यांना दिला. आणि पूरग्रस्तांना केंद्र शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच ज्या लोकांचे प्राण यामध्ये गेलेले आहेत,त्यांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी अशीही मागणी केली.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना बरोबर घेऊन निंबाळकर यांनी जी रणनीती आखली होती, व पक्षाने विजय मिळवला त्याबद्दल ही दोन्ही नेत्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.यावेळी दोन्ही नेत्यांनी याबाबत संपूर्ण सर्व सहकार्य केंद्र शासन करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत वाढली पाहिजे, याबाबत खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी प्रयत्न करावेत अशी सूचना अमित शहा यांनी दिली.तसेच यापुढील काळात खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असे हे संकेत शहा यांनी दिले. तसेच यावेळी मतदारसंघातील अनेक विषयावर चर्चा होऊन या मतदारसंघांमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभा राहायला पाहिजे, यासाठीही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना ही विनंती करण्यात आली असल्याचे खा.नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments