सोलापूर - जितके पैसे जमा तितकीच वीज वापरता येणार ; आता घराघरात स्मार्ट मीटर बसविणार
सोलापूर, घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रीपेड मीटरमध्ये जितके पैसे जमा तितकीच वीज आता ग्राहकांना वापरता येणार आहे. वीज वापरानुसारच ग्राहकांना बिल येणार आहे. दरम्यान, महावितरणने वीजचोरीस आळा, विजेचा काटकसरीने वापर, वीजबिलांसोबत चुकीच्या रीडिंग पद्धतीला आळा बसविण्यासाठी महावितरणने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. या मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येणार आहे.बाहेरगावी असाल तरी ग्राहकांना मीटर चालू किंवा बंद करता येणार आहे. त्यामुळे वीज खर्चावर नियंत्रण असणार आहे. हिंदुस्थान समाचार
0 Comments