google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार

Breaking News

सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार

 सांगोला तालुक्यातील तेरा शाळांची घंटा वाजणार


 चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेमुळे अद्यापही शाळेची घंटा वाजली नाही . त्यामुळे ...चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अद्यापही शाळेची घंटा वाजली नाही . त्यामुळे सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक , खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आदी ५३ ९ शाळेतील १ हजार ४ ९ शिक्षकांकडून ५५ हजार विद्यार्थ्यांना घरीच ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे . तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही , अशा ठिकाणी शिक्षक झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत . असे असताना शासनाने जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत , त्या गावात शासन जीआरनुसार ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्षांनी गावात शाळा सुरू करायची किंवा नाही याबाबत ठराव घ्यायचा आहे . त्यानुसार ग्रामस्थांनी होकार दिल्यास कोविड १ ९ सर्व नियम पाळून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे . या गावातील शाळा सुरू होणार तालुक्यातील ३५ कोरोनामुक्त गावांपैकी आलेगाव , जुजारपूर , भोपसेवाडी , उदनवाडी , हलदहिवडी , किडेबिसरी , डिकसळ , लक्ष्मीनगर , मांजरी , नराळे , पाचेगाव खुर्द , वाणीचिंचाळे , हंगिरगे या गावात १५ जुलैपासून शाळेची घंटा वाजणार आहे . दरम्यान या १३ शाळेतील ५ ९ शिक्षक ७०३ विद्यार्थ्यांना अध्यापन करणार आहेत . त्याअनुषंगाने शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे . त्याचबरोबर या शिक्षकांपैकी एखादा कर्मचारी बाहेर गावातन शाळेच्या ठिकाणी येत असेल तर त्यांनी सार्वजनिक वाहन साधनाचा वापर न करता खासगी वाहनाने शाळेच्या ठिकाणी यावे अशा सूचना दिल्या आहेत , असे गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments