google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोनाबाधित घटले ; म्युकरमायकोसिसचे सोलापुरात चार नवे रुग्ण , एकाचा मृत्यू

Breaking News

कोरोनाबाधित घटले ; म्युकरमायकोसिसचे सोलापुरात चार नवे रुग्ण , एकाचा मृत्यू

 कोरोनाबाधित घटले ; म्युकरमायकोसिसचे सोलापुरात चार नवे रुग्ण , एकाचा मृत्यू 


सोलापूर : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे नव्याने चार रुग्ण आढळले असून , एकाचा मृत्यू झाला आहे . कोरोनाबाधितांमद्ये घट झाली असून , गुरुवारच्या अहवालात ३१४ पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये तिघांचा बळी गेला आहे . जिल्हा आरोग्य विभागाने १४ हजार ८ ९ ० चाचण्यांचे अहवाल जाहीर केले . यात २ ९ ३ पॉझिटिव्ह तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे . म्रुत्यु पावलेल्या व्यक्ती माळशिरसमधील उगडेवाडी , करमाळ्यातील करंजे व माढ्यातील उपळाई खु . येथील आहेत . पॉझिटिव्हची .  एकुण संख्या १ लाख ३७ हजार ७७५ तर मृतांची संख्या ३ हजार २३ झाली आहे . १ लाख ३२ हजार ३५५ जण कोरोनामुक्त झाले असून , सध्या २ हजार ३ ९ ७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत . मनपा आरोग्य विभागाने १ हजार ५३२ चाचण्यांचे अहवाल जाहीर केले . यात २१ जण पॉझिटिव्ह आले तर एकाचाही मृत्यू झालेला नाही . अशाप्रकारे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८ हजार ६६५ तर , मृतांचा आकडा १ हजार ४० ९ इतकाच आहे . कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७ हजार १६२ इतकी झाली असून , ९ ४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत . म्युकरमायकोसिसमधून सहा जण बरे म्युकरमायकोसिसचे गुरुवारी चार रुग्ण नव्याने आढळले तर एकाचा मृत्यू झाला . अशाप्रकारे कूण बाधिताचा आकडा ५६ ९ तर मृताचा  आकडा ७८ इतका झाला आहे . बुधवारी सहा , जण बरे होऊन घरी परतले . बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१५ झाली आहे . सध्या रुग्ण उपचार घेत आहेत


Post a Comment

0 Comments