google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 या’ दोन नेत्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याची संधी.राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची जोरदार चर्चा.

Breaking News

या’ दोन नेत्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याची संधी.राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची जोरदार चर्चा.

 या’ दोन नेत्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याची संधी.राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची जोरदार चर्चा.

मोदी सरकार चा विस्तार झाल्यानंतर आता ठाकरे सरकार च्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदावर सुद्धा निवड होणार असून आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. त्यामुळे संजय राठोड हे राज्य मंत्रिमंडळात कमबॅक करणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.परंतु या राठोड यांच्या बाबत सर्व वरिष्ठांचे एकमत असणार का? हे काही दिवसातच समजेल.संजय राठोड यासोबतच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.आणि हे नाव जवळ जवळ फिक्स झाल्याचे समजते. नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे या जागेवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाबाबतही कांग्रेस पक्षात चर्चा सुरू आहे. नितीन राऊत यांना विधानसभा अध्यक्षपद आणि प्रणिती शिंदेंना एखादं राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.प्रणिती शिंदेंना मंत्रिपद कांग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापूर येथे म्हटलं, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूपकाही केलं आहे. त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा सातत्याने निवडून येत आहेत आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस कडून त्यांना मंत्रिपद देण्यात येईल असा मला विश्वास आहे.संजय राठोड काय म्हणाले संजय राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्याबाबत उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता संजय राठोड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांनी म्हटलं, माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील.ते जो निर्णय घेतील ते मला मान्य असेल.

Post a Comment

0 Comments