एक तर निर्बंध पूर्ण हटवा नाहीतर....; राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे विनंती
राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य सध्या हैराण झाले आहेत. तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक बोजा पडत आहे. याबाबत नागरिकांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत मागणी केल्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनबाबत मागणी करताना डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे कि, “कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णतः काढून जनतेला दिलासा द्यावा किंवा कडक लॉकडाऊन करावा. “देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही आहे.राज्यात पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला, तरी राज्याच्या इतर भागात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल करण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासंबंधी ठरावही सरकारने केला आहे. विधिमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे.
0 Comments