धक्कादायक! मंगळवेढ्यातील शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या
मंगळवेढयानजीक असणाऱ्या शांतीनगर येथील पृथ्वीराज रविंद्र लोकरे (वय.१९) या युवकाने अज्ञात कारणावरून राहते घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की , पृथ्वीराज रविंद्र लोकरे याने ३ जुलै रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.३० च्या सुमारास राहते घरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने स्लॅबच्या छताच्या हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.याची खबर मयत युवकाचे चुलते सिध्दार्थ रावसाहेब लोकरे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पो ना.तळवार हे करीत आहेत.दरम्यान मयत पृथ्वीराज चे वडील हे प्राथमिक शिक्षक असून पृथ्वीराज याने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत.सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत बैठक , जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या त्या चिमणीबाबत दि.५ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.दि नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल प्रिंसीपल बेंच नवी दिल्ली यांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक होत असून, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर , जिल्हा दंडाधिकारी यांची संयुक्त समिती करुन या प्रकरणाची सुनावणी करुन पुढील दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानूसार ही सुनावणी होणार आहे. कारखान्याने उभारलेल्या चिमणीमुळे जर पर्यावरणीय नियम रांचे उल्लघंन होत असेल व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांनी उपाय योजना कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
0 Comments