google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याजवळ भीषण अपघात : पिकअप जीप व आयशर टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला.

Breaking News

सांगोल्याजवळ भीषण अपघात : पिकअप जीप व आयशर टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला.

सांगोल्याजवळ भीषण अपघात : पिकअप जीप व आयशर टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला


 सांगोला-पंढरपूर रस्त्यावरील फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजजवळ रविवारी सकाळी नऊ वाजता पिकअप जीप व आयशर टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. आयशर टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला-पंढरपूर रस्त्यावरील फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजजवळ रविवारी सकाळी नऊ वाजता पिकअप जीप व आयशर टेम्पोची जोरदार धडक झाली. आयशर टेम्पो हा पंढरपूरहून सांगोल्याकडे येत होता, तर पिकअप जीप ही सांगोल्याहून पंढरपूरकडे चालली होती.या अपघातात रस्त्याने जाणा-या एका वाटसरूचा व पिकअपमधील एकाचा अशा दोघांचा मृत्यु झाला. दोन्ही वाहनांच्या समाेरचा भाग चक्काचूर झाला. मृतांची नावे समजू शकली नाहीत.या अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. जखमींना सांगोला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Post a Comment

0 Comments