google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकर्‍यांना संरक्षण देणारा नवीन कायदा ठाकरे सरकार आणणार; फसवणूक केल्यास 'एवढ्या' वर्षांच्या कारावासाची शिक्षा -

Breaking News

शेतकर्‍यांना संरक्षण देणारा नवीन कायदा ठाकरे सरकार आणणार; फसवणूक केल्यास 'एवढ्या' वर्षांच्या कारावासाची शिक्षा -

 शेतकर्‍यांना संरक्षण देणारा नवीन कायदा ठाकरे सरकार आणणार; फसवणूक केल्यास 'एवढ्या' वर्षांच्या कारावासाची शिक्षा -


केंद्र सरकारने जो कृषी कायदा केला आहे त्याला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला आहे. नव्या कायद्यात शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये यासाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.शेतकर्‍यांची फसवणूक झाली तर त्याबाबत फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करता येईल. यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. अशी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार नवीन कृषी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्याच्या तुलनेत राज्यातील शेतकर्‍यांना अधिक संरक्षण देण्यात येणार असल्याचे समजते.केंद्र सरकारचा कृषी कायदा बिगर भाजप राज्यात लागू केला जाणार नाही, अशी भूमिका काही राज्यांनी घेतली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारनेही त्याला विरोध करत शेतकर्‍यांना संरक्षण देणारा नवीन कायदा आणण्यात येणार आहे. आगामी अधिवेशनामध्ये हा कायदा मांडला जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments