चिकमहुद सांगोला दलित वस्तीतील दलीत समाजाचा रस्ता गावगुंडाने बंद करून दारकोंडी केलेली आहे . त्याच्या निदेषार्थ १५ अगस्ट २०२१ रोजी सामोहीक उपोषण तहसिल कार्यालय समोर करणे बाबत
मौजे -चिकमहूद ते भाळवणी जुना रस्ता नकाशामध्ये पूर्वीपासून आहे परंतु सध्या सदरचा रस्ता अतिक्रमण झाल्याने पूर्णपणे नष्ट झालेला आहे . सदर रस्ता दलितवस्ती सुधार योजनेतंर्गत स्वखर्चाने निम्म्यापर्यंत तयार केलेला असून राहिलेला रस्ता अतिक्रमणातील काही शेतकरी जागा खुली करुन देत नाही
त्यामुळे दलितवस्तीतील लोकांना जाणे येणेसाठी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय निर्माण झालेली आहे .दलितवस्तीची लोकसंख्या साधारपणपणे १२५ इतकी असून मुलांना शाळेला जाणे येणे बंद झाले आहे तसेच सदर रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेता येत नाही तरी सदरचा रस्ता ८-१० दिवसाचे आत त्वरीत खुला करुन मिळावा . उपस्थित राष्ट्रीय मानवाधिकार एंव भ्रष्टाचार निवारन (भारत ) महाराष्ट्र राज्य वरिष्ठ कार्याध्यक्ष श्री सोमनाथ नाईकनवरे राष्ट्रीय मानव अधिकार जिल्हा युवा सचिव श्री सचिन गणपत माने,लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका अध्यक्ष श्री आप्पासाहेब वाघमारे ,मी वडार महाराष्ट्राचा सांगोला तालुका अध्यक्ष श्री महादेव बाबुराव डोंगरे ,अंकुश रामचंद्र वाघमारे, दत्तात्रय दादासाहेब साळुंके ,नाना दगडू साळुंके ,विनोद जालिंदर वाघमारे ,अक्षय पांडुरंग साठे, सुरज रामहरी धोत्रे रस्ता त्वरीत खुला न झालेस सर्व दलित बहुजन संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन , रस्ता रोको केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील . ही विनंती .
0 Comments