सोलापूर ब्रेकिंग! 'या' तालुक्यातील सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले; पोलिसांची शोधमोहीम सुरू -
विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये माढा सबजेलमधे असलेले चार आरोपी आज सकाळी जेलमधून पळून गेले आहेत. पलायन केलेल्या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके पाठवून व नाकाबंदी करून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, की आज सकाळी माढा सबजेलमधून सिद्धेश्वर शिवाजी केचे, अकबर सिद्धाप्पा पवार, आकाश ऊर्फ अक्षय रॉकी भालेकर, तानाजी नागनाथ लोकरे अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे असून,या आरोपींवर खून, बनावट चलनी नोटा व्यवहार, पोक्सो, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. यातील दोन कुर्डुवाडी तर दोन टेंभुर्णी पोलिस ठाण्याकडील गुन्ह्यांतील आहेत.माढा तहसील कार्यालयाच्या आवारातच माढ्याचे सबजेल आहे. या भागात दिवसभर लोकांची वर्दळ असते. मात्र, सकाळच्या वेळी या ठिकाणी विशेष वर्दळ नसते.पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची दोन व माढा पोलिसांची तीन पथके तैनात केल्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी सांगितले.
0 Comments