google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उर्वरीत सातही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापक्षाचे वर्चस्व

Breaking News

उर्वरीत सातही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापक्षाचे वर्चस्व

 उर्वरीत सातही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापक्षाचे वर्चस्व


सांगोला ( विशेष प्रतिनिधी ) : - आरक्षण सोडतीमध्ये ज्या प्रवर्गाचे आरक्षण निघाले त्या प्रवर्गाचे सदस्य नसलेमुळे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी झालेल्या नव्हत्या त्या सातही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली व त्या आनुषंगाने सातही गावच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम नुकताच पार पडला सदर निवडीमध्ये सांगोले तालुक्यातील बुरंगेवाडी , हणमंतगाव , निजामपुर , खिलारवाडी , भोपसेवाडी , आगलावेवाडी व तरंगेवाडी या गावच्या सरपंच निवडीमध्ये प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला .


त्यामुळे त्या सातही ठिकाणच्या सरपंच निवडी बिनविरोध पार पडल्या . सदर निवडीमध्ये सर्वच्या सर्व ७ ठिकाणी शेकापक्षाचेच सरपंच विराजमान झाल्यामुळे शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करुन फटाक्यांची आतशबाजी करून विजयीउत्सव साजरा केला . सरपंचपदी विराजमान झालेल्या सरपंचांची नांवे पुढीलप्रमाणे १ ) बुरुंगेवाडी- राजाका अर्जुन बुरुंगे , २ ) हणमंतगांव- दिपाली तात्यासाहेब खांडेकर , ३ ) निजामपुर कमल नानासो कोळेकर , ४ ) खिलारवाडी - शांताबाई शरद हिप्परकर , ५ ) भोपसेवाडी- सखुबाई सुनील नरळे , ६ ) आगलावेवाडी. शांता हरीचंद्र हाके , ७ ) तरंगेवाडी- जयश्री शरद खताळ , यांची सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत . सदर निवडीमुळे भाई डॉ.गणपतराव देशमुख व त्यांच्या विचारावरती आजही कार्यकर्ते विश्वास ठेवतात व त्यांचे विचार पुढे चालवण्यासाठी तयारी दाखवतात , हे यावरुन सिध्द झाले आहे . निवडुन आलेल्या सर्व सरपंच उमेदवारांचे भाई चंद्रकांतदादा देशमुख यांनी अभिनंदन व सत्कार केला . त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच डॉ.अनिकेत देशमुख व डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ही सदर निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या . सरपंचपदाच्या निवडी बिनवीरोध करण्यासाठी शेकापक्षाचे प्रमुख नेते , आजी माजी सभापती , आजी - माजी जिल्हा परीषद सदस्य , पंचायत समितीचे आजी - माजी सदस्य व गावपातळीवरील शेकापक्षाचे कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले . आबासाहेबांनी रूजवलेल्या विचारमुळे व त्यांच्या श्रध्देपोटी व दोन्ही डॉक्टर बंधुंच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सुध्दा शेकापक्ष असेच निर्वीवाद यश मिळवणार असल्याचे मत शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments