मंगळवेढा ब्रेकिंग! तालुक्यातील आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या -
अज्ञात कारणावरून एका तरुणाने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाच जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे ही घटना उघडकीस आली. दरम्यान दोन दिवसातील ती दुसरी घटना आहे.विजय पांडूरंग कोळी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. विजय याने चुलत भाऊ सुरेश माने यांच्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.मात्र , त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दत्ता नारायण माने यांनी पोलिसांत खबर दिली. अकस्मात मृत्यू म्हणून येथील पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी हेडकॉन्स्टेबल जाधव तपास करीत आहेत.आत्मदहनाचा प्रयत्न, शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी निलंबित शिक्षक महांतेश्वर कट्टीमनी (वय ५०, रा.समतानगर अक्कलकोट) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार शब्बीर तांबोळी यांनी सदर बझार पोलिसात तक्रार दिली आहे.हा प्रकार सोमवारी दुपारी एकच्या सुमारास यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. आवारात पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.कट्टीमनी यांना शिक्षक सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत न्याय मिळावा, यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments