google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हवालदार महिलेने वृद्ध सासूला पेट्रोलजन्य पदार्थ ओतून पेटविले

Breaking News

हवालदार महिलेने वृद्ध सासूला पेट्रोलजन्य पदार्थ ओतून पेटविले

 हवालदार महिलेने वृद्ध सासूला पेट्रोलजन्य पदार्थ ओतून पेटविले 


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक वादातून पोलिस हवालदार महिलेने सासूच्या तोंडावर पेट्रोलजन्य ज्वलनशील पदार्थ ओतून पेटविल्याची खळबळजनक घटना कसबा बावडा येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकरनगर येथे रविवारी मध्यरात्री घडली . श्रीमती आशालता श्रीपती वराळे ( वय 80 ) असे जखमी वद्धेचे नाव आहे . नात्याने सून असलेल्या पोलिस हवालदार संगीता राजेंद्र वराळे ( 51 ) हिच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . जखमी वृद्धेवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून , त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले . हवालदार संगीता वराळे हिच्याविरुद्ध सासूच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे . संशयित वराळेला सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले .पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी सून संगीता व सासू आशालता यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक कारणातून मतभेद आहेत . कसबा बावडा येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकरनगर येथील राहत्या घरात रविवारी मध्यरात्री सासू - सुनेतील वाद विकोपाला गेला . त्यातून संगीताने पेट्रोलजन्य ज्वलनशील पदार्थ सासू आशालता यांच्या तोंडावर ओतला . त्यावर पेटलेला कागद टाकून पेटविले , असा जबाब आशालता यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर दिला आहे . आशालता यांना इजा झाल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे . त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले . या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे . पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण , पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली . संशयित संगीता वराळे पोलिस दलात हवालदार असून , ती सध्या पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत आहे .

Post a Comment

0 Comments