आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच
आता कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहे.सोलापूर : शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. मानसिक तणावाखाली काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून शारीरिक व मानसिक दुष्परिणाम त्यांच्यात दिसू लागले आहेत. अनेकांकडे ऍन्ड्राईड मोबाईल नाहीत. या पार्श्वभूमीवर आता कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहेराज्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तर 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शाळा बंद असल्याने मुलांमध्ये चिडचिडपणा, मानसिक आजारात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा अडथळा आहे. त्यामुळे मुलांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. त्यामुळे निकषांचा आधार घेऊन शालेय शिक्षण विभागान आठवी ते बारावीचे वर्ग सुरुविभागानेचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाळांना गावकरी, पालकांसोबत ठराव करून घ्यावा लागणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाही शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना तो आपल्या अंगावर येऊ नये याची पुरेपूर काळजी शिक्षण विभागाने घेतल्याची चर्चा आहे.शाळा सुरू करण्याचे निकष...कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यास मान्यता शाळा सुरु करताना मुलांना टप्प्याटप्याने बोलवावे; वर्गांची अदलाबदली करून सकाळी, दुपारी भरवावी शाळा इंग्रजी, विज्ञान, गणीत या विषयांनाच द्यावे प्राधान्य एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा; दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत सतत हात साबणाने स्वच्छ धुवावेत, मास्कचा वापर करावाकोरोनासदृश लक्षणे असलेल्या मुलास तत्काळ घरी पाठवावे; त्याची कोरोना चाचणी करावी शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात असावी; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर प्रवासासाठी करू नये कोरोनामुक्त गाव कसे ठरवायचं?सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील गावांमध्ये काही प्रमाणात कोरोना वाढतच आहे. तर काही गावांमधील कोरोना कमी झालेला नाही. दरम्यान, एक गाव कोरोनामुक्त झाले असून त्याच्या शेजारील गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासंदर्भात कोरोनामुक्त गावाचा निकष काय असणार, याचे आदेशात स्पष्टीकरण नाही. त्यामुळे एक-दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्त गावातही शाळा सुरू होतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
0 Comments