google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांचे काम बंद रजा आंदोलन मागे …

Breaking News

मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांचे काम बंद रजा आंदोलन मागे …

 मागील आठ दिवसांपासून सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील तलाठ्यांचे काम बंद रजा आंदोलन मागे …

 काम बंद आंदोलनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाले होते कामे ठप्प...मागण्यामान्य झाल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांनी घेतले आंदोलन पाठीमागे …


सोलापूर जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून तलाठ्यांनी बेमुदत रजा आंदोलन सुरू होते.सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने त्यांनी शासन दरबारी वारंवार निवेदन मोर्चे आंदोलन करूनही मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलन सुरू केले होते.आज अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्याशी झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य केल्याने जिल्ह्यातील तलाठी कर्मचाऱ्यांनी रजा मागे घेतले आहे.नवीन तलाठी सज्जे व महसूल मंडळ निर्मिती करणे , तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती देणे , सेवाजेष्ठता यादी अद्यावत ठेवणे आणि तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.आठ दिवसांपासून आंदोलन सुरू होते.दोन दिवसांमध्ये मागण्यांचा विचार न झाल्यास पुणे विभागामधील पाच जिल्ह्यांतील सर्व तलाठी या आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन सुरू करतील असा इशारा यावेळी तलाठी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता.आज झालेल्या बैठकीत पदोन्नतीचा आदेश त्वरित पारित करण्यात आला.सजा पुनर्रचना बाबत दोन तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये आदेश काढण्यात आले. पदोन्नतीचे आदेश दोन दिवसात काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर तलाठी संघटनेने आपले आंदोलन पाठी मागे घेतले आहे.

Post a Comment

0 Comments