google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शिवसैनिकाची हत्या

Breaking News

धक्कादायक! सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शिवसैनिकाची हत्या

धक्कादायक!सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शिवसैनिकाची हत्या  


सोलापुरात नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशीरा शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली.सतीश क्षीरसागर या शिवसैनिकाचा मृत्यू झाला तर त्याचा साथीदार विजय सरवदे हा जखमी झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे हे दोन शिवसैनिक बाईकवरून जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाठीमागून टेम्पो घालण्यात आला.यात सतीश क्षीरसागर याचा मृत्यू झाला तर विजय सरवदे हा जखमी झाला आहे.दरम्यान, या प्रकरणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारीचा राग चार महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती.या तक्रारीवरुन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी करताना बोगस नावं कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही बोगस नावं कमी करण्यात आली. तसंच, रमाई आवास योजनेच्या २८ मंजूर गायब फाईलींबाबतही शिवसेनेच्या या दोन कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments