मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १५ टक्के निधी खर्च का केला नाही माहितीच्या अधिकाराला मुदत संपली तरी उत्तर नाही .. !
नाझरा : बझरे ता . सांगोला येथील गावातील काही नागरिकांनी मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला १५ टक्के निधी खर्च का केला नाही अशी विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत माहितीच्या अधिकाराखाली संबंधित ग्रामपंचायत मधील ग्रामसेविका यांच्या कडून माहिती मिळवण्याकरिता १ महिन्यापूर्वी माहितीचा अधिकार अर्जदार ज्ञानेश्वर विष्णू वाघमारे यांच्या नावाने दाखल केला होता . सदरच्या माहिती अधिकाराला एक महिन्यात उत्तर देण्याचे बंधन आसून देखील माहिती दिली गेली नाही ती माहिती नागरिकांना देणे हे शासन व प्रशासनाचे कर्तव्य आहे असे असून देखील काही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे जर आपले काम पारदर्शक व प्रामाणिकपणे असेल तर कोणत्याही नागरिकांनी योग्य प्रकारे योग्य विषयाची माहिती मागवली असेल तर ती माहिती , माहिती अधिकार कायद्यान्वये देणे बंधनकारक असून त्या संबंधित माहिती दिली गेली पाहिजे याचे भान संबंधित अधिकारी यांनी बाळगले पाहिजे . तसेच अशाप्रकारे माहिती अधिकाराखाली संबंधित अधिकारी माहिती देत नसल्यास वरिष्ठांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती समज द्यावी व नागरिकांच्या या हक्काला बळकटी देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून शासन व प्रशासनाबद्दल समाजात चुकीचा संदेश जाणार नाही . नागरिकाला आपल्या शंकेचे निरसन करणे सोपे जाईल यातूनच सदृढ लोकशाही टिकून राहील व त्यावरील विश्वास अबाधित राहील याची काळजी घेतली पाहिजे .
0 Comments