google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ॲट्रॉसिटी व आरक्षण विरोधी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर

Breaking News

ॲट्रॉसिटी व आरक्षण विरोधी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर

 ॲट्रॉसिटी व आरक्षण विरोधी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी : नगरसेवक सुरज दादा बनसोडे

तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर 


सांगोला/प्रतिनिधी :ॲट्रॉसिटी व आरक्षण विरोधी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सध्या महाराष्ट्रात ॲट्रॉसिटी व आरक्षण विरोधात जातिवाचक विरोधाची वक्तव्य काही लोकप्रतिनिधी व जातीयवादी लोक करत आहेत. शासनाने मागासवर्गीय नोकरीची ते 30 टक्के पदोन्नती कमी करण्यासंदर्भात ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी तो ठराव रद्द करण्यात यावा. तसेच बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ॲट्रॉसिटी विरोधात खंडणी व दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करा असे जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे दूर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा लोकप्रतिनिधींचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण करण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. सांगोला तालुक्यामधील 62 ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण पदांमध्ये अनुसूचित जातीचे 13 सरपंचपद आरक्षित होणे नियमानुसार बंधनकारक होते. परंतु काही गावात अनुसूचित जातीचा सदस्य नसताना त्या गावात अनुसूचित जातीचे सरपंच पदाचे आरक्षण टाकण्यात आले. परंतु नंतर काही कारणास्तव 6 गावाचे अनुसूचित जातीचे सरपंच पद निवडण्यात आले. उर्वरित 7 जागेसाठी आरक्षण बदलण्याचा कार्यक्रम 3 जुलै रोजी होणार आहे. वास्तविक पाहता अनुसूचित जातीच्या 7 सरपंच पदाच्या आरक्षित जागा कमी करण्याचा शासनाचा व काही जातीवादी लोकप्रतिनिधींचा डाव असून त्यांनी निवडी रद्द करून उर्वरित सात जागी अनुसूचित जातीचे आरक्षित पद जाहीर करावे. अशी मागणी नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनाचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून या चार योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व मागासवर्गीय संघटना तर्फे शासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल संदर आंदोलनाने कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याचा पूर्ण पत्ता प्रशासन जबाबदार राहील. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन देतेवेळी नगरसेवक सुरज दादा बनसोडे, दीपक होवाळ, जगन्नाथ साठे, आनंद मागाडे, सचिन गोतसूर्य, बीरा चव्हाण, फुलचंद बनसोडे, अण्णासाहेब गस्ते, शैलेश सूर्यगंध, रजनीकांत सूर्यगंध, चंद्रकांत मोरे, राजू गुळीग, पंकज बनसोडे, सुनील कांबळे, बहुजन क्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष रविंद्र कांबळे, सुधीर वाघमारे, रोहित बनसोडे, चंद्रशेखर बनसोडे, राकेश बनसोडे, माणिक सकट, अजय ठोकळे, विकी साळवे, प्रीतम ठोकळे, दादासाहेब माने, सिद्धेश्वर भडकुंबे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments