सांगोला नगरपरिषदेचा दिव्यांगांना मदतीचा हात ९ ३ जणांच्या थेट बँक खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये जमा
सांगोला , ( प्रतिनिधी ) : शहरातील , दिव्यांग बंधू भगिनींसाठी नेहमीच मदतीस धावणाऱ्या सांगोला नगरपरिषदेमार्फत शहरातील ९ ३ दिव्यांगांसाठी प्रति लाभार्थी ६००० रु प्रमाणे एकूण ५ लाख ५८ हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली . केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी समान संधी , संरक्षण व समान सहभाग कायदा १ ९९ ५ हा १ ९९ ६ पासून लागू केला आहे.या कायद्यातील कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिव्यांग नागरिकांना दारिद्र्य निर्मूलन योजने अंतर्गत ५ % निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत व सदर ५ % निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याकरता मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.मागील वर्षीपा सून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे दिव्यांग नागरिक हे अत्यंत हलाखीच्या परिस्थिती तुन जात आहेत .एकीकडे कोरोना आणि दररीकडे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिव्यांग बांधवांकडून सांगोला नगरपरिषदेकडे अर्थ साहाय्य मि ळण्याबाबत लेखी निवेदन प्राप्त झाले . सांगोला नगरपरिषदेकडे नगरपरिषद हद्दीतील एकूण ९ ३ नोंदणीकृत दिव्यांग बांधव आहेत.या सर्व दिव्यांग बांधवांच्या लेखी निवेदनाला प्रतिसाद देत सांगोला नगरपरिषदेमार्फत सर्व ९ ३ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ६००० / - रुपये याप्रमाणे एकूण ५ लाख ५८ हजार रुपये थेट त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले . हा निधी पाठविण्यासाठी लाभात्यांच्या घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करणे , बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सर्व दिव्यांगांचे बँक खाते सुरू असले बाबत खात्री करने व इत सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी करनिरीक्षक तृती रसाळ , सहा.मालमत्ता । पर्यवेक्षक स्वप्नील हाके , लेखापरीक्षक विजय कन्हेरे यांनी विशेष मेहनत घेतली .कोरोनाने आर्थिक घडी विस्कटलेल्या दिव्यांग बंधू , भगिनींना नगरपरिषदेमार्फत केलेल्या या आर्थिक साहाय्य चा निश्चितपणे उपयोग होईल असे वाटते . शहरातील दिव्यांगांच्या अधिकारांचे , हक्कांचे संरक्षण यासाठी सांगोला नगरपरिषद सदैव कटिबद्ध आहे . कैलास केंद्रे मुख्याधिकारी , सांगोला नगरपरिषद सांगोला नगरपरिषदेमार्फत केलेल्या आर्थिक मदतीचा लाभात्यांनी सुयोग्य वापर करावा तसेच नगरपरिषदेकडे अद्याप नोंद नसणाऱ्या शहरातील पात्र दिव्यांगांनी नगरपरिषदेकडे कागपत्र जमा करून तात्काळ नोंद करून घ्यावी . राणिताई माने नगराध्यक्षा , सांगोला नगरपरिषद
0 Comments