google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार? सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराला मिळणार मंत्रिपद? -

Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार? सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराला मिळणार मंत्रिपद? -

 राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार? सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराला मिळणार मंत्रिपद? -


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत. त्याची पोचपावती म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांना निश्‍चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसकडून मंत्रिपद मिळेल असा विश्वास कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापुरात व्यक्त केला.त्यामुळे सोलापुरातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. त्यात कोणाला संधी मिळणार, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लढवले जात आहेत.त्यात ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांचे आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे.आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आंध्र प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री व देशाच्या उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते. त्यांचे कॉंग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे योगदान राहिले आहे.मात्र नुकताच एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, की कॉंग्रेसमध्ये माझ्या शब्दाला पूर्वीसारखी किंमत राहिलेली नाही.’ त्यांच्या या हताश वक्तव्याने कॉंग्रेस पक्षात एकप्रकारे मरगळलेपणा आला होता.सुशीलकुमार शिंदे यांची कॉंग्रेस पक्षामधील जी कारकीर्द आहे व त्यांनी पक्षासाठी जे अनमोल योगदान दिले आहे, ते लक्षात घेता व प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीची हॅट्ट्रिक, त्यांची सोलापुरातील लोकप्रियता पाहता, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद मिळेल,याबाबत कार्यकर्त्यांनाही आशा आहे. त्याच मुद्द्याला धरून ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत प्रणितींना मंत्रिपद मिळणार असल्याचे वक्तव्य केल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments