google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

Breaking News

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 पुढील 5 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’


मागील तीन-चार दिवसांत पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.या जिल्ह्यांना रेड अलर्टआज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीने ते चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सलग तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. आज घाट परिसरातील पुण्यासह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं विजांचा गडगडाट होणार आहेत पुढील 3 तासात या जिल्ह्यात मुसळधार हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नंदूरबार आणी बीड या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments