google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली .

Breaking News

सांगोल्यात एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली .

 सांगोल्यात युवकाची आत्महत्या सांगोला : एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली . त्याच्या आत्महत्येमागील कारण ...


सांगोला : एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली . त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही . जय राजू साठे ( वय १ ९ , रा.संजयनगर झोपडपट्टी , सांगोला ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून , मंगळवार , १३ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली . संजयनगरमध्ये राहणारे सचिन सर्जेराव . गायकवाड हे मंगळवार सकाळी भाचा जय राजू साठे याचे घरी टुथपेस्ट आणण्यासाठी गेले होते . खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी बाहेरून आवाज दिला . मात्र , दार न उघडल्याने संशय बळावला आणि दरवाजा ढकलून ते आत गेले . आतमध्ये भाचा जय साठे याने बाहेरील रूममधील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले . इतक्यात ,शेजारी राहणारे अजीज नदाफ व त्यांचे वडील सर्जेराव गायकवाड यांनी ओढणी कापून त्याला खाली उतरवले आणि उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . मात्र , उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले . याबाबत जयचे मामा सचिन गायकवाड यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे .

Post a Comment

0 Comments