बलवडीचे माजी सरपंच विजयदादा शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश आरक्षण प्रश्नावर महाआघाडी - भाजप जनतेची दिशाभूल करीत आहेत- भाई जयंत पाटील
सांगोला : आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही , संविधानाने तो अधिकार संसदेला दिला आहे . मराठा , ओबीसी किंवा इतरांना आरक्षण द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती करून तशी सुधारणा करण्याची गरज असतांना राज्यातील महाआघाडी आणि भाजप हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत , अशी टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली . सांगोला तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकत्यांसह आज आबासाहेबांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला . या पक्षप्रवेशाप्रसंगी भाई जयंत पाटील बोलत होते . भाई जयंत पाटील पुढे म्हणाले , मंडल आयोगाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा ही मागणी करणारा शेतकरी कामगार पक्ष हा पहिला पक्ष आहे . व्हि . पी.सिंगांनी त्यावर अंमलबजावणी सुरु केली तर त्यांच्या विरोधात भाजपाने देशात रान उठविले , प्रचंड विरोध केला आणि व्हि.पी.सिंगांचे सरकार गेले.आज तोच भाजप मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलतो हे हास्यास्पद असून महाविकास आघाडी आणि भाजपला राज्यातील ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा बाढवावी.मात्र त्यांना असे करुन जनतेला न्याय द्यायचे नाही तर केवळ राजकारण करायचे आहे , त्यामुळे राज्यातील बहुजनांनी सावध व्हावे असे आवाहन भाई जयंत पाटील यांनी केले . आघाडीच्या जागा वाटपाची बैठक ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली . शेकापसह डाव्या पक्षांनी मागितलेल्या जागा सोडल्यानंतरही काँग्रेस राकाँने मागाहून उमेदवार दिले आणि शेकापक्षासह डाव्यांना दगा दिला . मात्र कार्यकर्ते हिच शेतकरी कामगार पक्षाची खरी ताकद आहे . हे सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिले आहे . सुरुवातीपासूनच केंद्राने केलेले कायदे संपूर्णपणे रद्द करण्यात यावेत बासाठीच राष्ट्रीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे मागणी करण्यात येत असतांनाही राज्यातील महाविकास आघाडीने विधानसभेत दुरुस्ती विधेयक आणले आहे . ही दुटप्पी भूमिका मान्य नसल्याने आता हा लढा भाजप काँग्रेसच्या विरोधात डाव्या आघाडीच्या वतीने बापुढे ताकदीने लढण्यात येईल , असेही भाई जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले . शिवसेनेचे नेते विजयदादा शिंदे यांसह शेकापक्षात प्रवेश केलेल्या शेकडो कार्यकत्यांचे स्वागत करतांना बुवा नेते डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले , आजच्या कार्यक्रमाला आबासाहेब उपस्थित नाहीत मात्र आबासाहेबांचा वारसा जशाचा तशाच पद्धतीने आमच्याकडून पुढे चालविण्यात येईल . सांगोल्याकडे सरचिटणीसांनी काळजीने बघण्याची वेळ आम्ही येवू देणार नाही , असा विश्वास व्यक्त केला . तसेच शिवसेनेने केलेला विजयदादांवरचा अन्याय शेकापक्षाकडून दूर करण्यात येईल असेही डॉ.देशमुख म्हणाले . पक्षप्रवेश कार्यक्रमाला पक्षाचे खजिनदार भाई राहुल पोकळे , कार्यालयीन चिटणीस भाई राजेंद्र कोरडे , चिटणीस मंडळाचे सदस्य भाई बाबासाहेब कारंडे , श्रीमंत कोकाटे , भाई चंद्रकांत देशमुख , तालुक्यातील शेकापक्षाचे सरपंच , उपसरपंच यांचेसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments