google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 'हा' पोलीस कर्मचारी निलंबीत; पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई -

Breaking News

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 'हा' पोलीस कर्मचारी निलंबीत; पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई -

 मंगळवेढा पोलीस ठाण्यातील 'हा' पोलीस कर्मचारी निलंबीत; पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई -


वाळू चोरीच्या गुन्ह्यातील ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजाराची लाच मागीतल्याप्रकरणी पोलीस कोठडी मिळालेला पोलीस नाईक संतोष चव्हाण यास जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय सेवेतुन निलंबित केले आहे.निलंबीत पोलीस नाईक हा बोराळे बिट मध्ये कार्यरत असताना येथील एका व्यक्तीचा ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन आवारात लावला होता.या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी वाहन चालकाकडे ३० हजार रूपये लाचेची भ्रम्हणध्वनीद्वारे मागणी केली होती.सदर अधिक्षक वाहनचालकाने याबाबत पुणे अधिक्षक लाचलुचपत विभागाकडे तक्रार झाल्यानंतर केल्यानंतर भ्रमणध्वनी वरील संभाषणाची पडताळणी करून पो.नाईक चव्हाण विरूद्ध मंगळवेढा असल्याचे पोलीसात गुन्हा दाखल करून लाचलुचपत विभागाने अटक केली होती.न्यायालयाने या प्रकरणात त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. सदर घटनेनंतर याचा अहवाल पोलीस अधिक्षक कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना निलंबित केल्याचा आदेश मंगळवेढा पोलीस स्टेशनला प्राप्त झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments