इ.५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 ऑगस्ट 2021 ऐवजी 9 ऑगस्ट 2021 होणार
23 मे ला होणाऱ्या इ.५वी इ.८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्या कोविड चा प्रादुर्भाव राज्यात कमी झालेला असून जनजीवन पूर्ववत होत आहे, त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून, सदर परीक्षा दि.०८ ऑगस्ट,२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याचे सह सचिव, महाराष्ट्र शासन राजेंद्र पवार यांच्याद्वारे पत्र जाहीर करून कळविण्यात आले होते. परंतु दि. ०८/०८/२०२१ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) दि. 8/8/2021 ऐवजी दि. 9/8/2021 ला घेण्यात येणार आहे. तसेच सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27/7/2021 रोजी संबंधित शाळांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उपरोक्त परीक्षेच्या तारखेची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे व गट शिक्षणाधिकारी एम.एल.मेश्राम यांनी केले आहे.
0 Comments