सोलापूर ग्रामीण आस्थापनेवर नेमणुकीस असलेल्या पोलीस अंमलदार कोरोनाने मयत झाल्याने ५० लाख रक्कमेचा चेक सुपूर्द करण्यात आला
कोविड -१ ९ च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील कुडुवाडी पोलीस ठाणेस नेमणुकीस असलेले सपोफौ / साधु उर्फ सहदेव मच्छिंद्र जगदाळे हे शासकीय कर्तव्य बजावित असताना त्यांना कोविड -१ ९ ची या सांसर्गिक रोगाची लागण होवून दि . ०७/०१/२०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना रक्कम रुपये ५० लाख इतकी रक्कम “ सानुग्रह सहाय्य अनुदान पोटी मंजूर करण्यात आलेली आहे . मा . पोलीस अधिक्षक सो . तेजस्वी सातपुते यांचे हस्ते वारसदार पत्नी स्वाती साधु उर्फ सहादेव मच्छिंद्र जगदाळे यांना रक्कम रू .५० लाख इतक्या रक्कमेचा चेक सुपूर्द करण्यात आला आहे .


0 Comments