विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे प्रा डॉ अशोकराव शिंदे प्राचार्य प्रा डॉ रघुनाथ फुले प्रा डॉ दीपक रिटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा डॉ अशोकराव शिंदे शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की हा सोहळा साजरा करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी चालवलेले रयतेचे राज्य व महाराज राजे झाल्यानंतर त्यांनी चालवलेले प्रशासन त्यामध्ये असलेली सर्वसमावेशकता सर्व जाती धर्म व्यवस्थेला दिलेली समान संधी न्याय हे खूप महत्त्वाचे आहे आहे तेव्हा या सोहळा या निमित्त शिवाजी महाराज यांचे कार्य आपण डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये जगले पाहिजे तरच हा राज्याभिषेक सोहळा आपण पार पाडला असे समजून हा सोहळा प्रत्येक क्षण प्रत्येकाच्या विचाराने वेगळा समजेल पण निश्चित एक आहे की देशातील आदर्शवादी व्यक्तिमत्व म्हणून राजे छत्रपती शिवाजी राजे यांचाच आदर्श विद्यार्थी विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ रघुनाथ फुले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेच्या सुखासाठी समाधानासाठी त्यांनी असं की जमिनी दान केल्या व त्यातून रयतेला समानतेचे व मानवतेची वागणूक दिली रयतेच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शत्रूशी दोन हात पुढे केले त्यामुळेच छत्रपती शिवाजी राजे हे एक स्वराज्याची निर्मिती करणारे अन होते एक महाराष्ट्रातील जाणता राजा देशाला जगाला आपल्या कार्याने विचाराने तत्त्वाने प्रशासनाने प्रेरक व आदर्शवादी ठरले आहेत तेव्हा अशा या महान छत्रपती शिवाजी राजे यांना या सोहळ्यानिमित्त मानाचा मुजरा कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मनोगत नियोजित अनियोजित समितीचे चेअरमन प्रा दिपक रिटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपक रिटे यांनी केले तर आभार स्वप्नील शिंदे यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टन शन ठेवून पार पाडण्यात आला


0 Comments