पर्यावरण दिनी प्रत्येकाने एक झाड लावावे : पोलीस निरीक्षक सुहास जगताप नाझरेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपन
नाझरे : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! पक्षीही सुस्वरे आळविइती येणे सूखे रुचे एकांताचा वास ! नाही गुणदोष अंगा येत !! जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्व सांगितले. त्यामुळे पर्यावरण दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे ता. सांगोला येथे सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.देशात व राज्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत प्रत्येकास ऑक्सिजनची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने पर्यावरण दिनी किमान एक झाड लावून त्यांची जोपासना करावी व पर्यावरणाचा ध्यास धरून सृष्टीस आकार द्यावा. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व निसर्गप्रेमींनी मदत करावी असे मत पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी बोलताना व्यक्त केले.यावेळी सरपंच विजयकुमार देशमुख यांनी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा शाल फेटा देऊन सत्कार केला. यावेळी समाज सेवक अप्पूराज आदाटे, आशिष सोनवणे, अनिल जाधव, प्राचार्य पी.डी. परिचारक, माजी सरपंच महालिंग पाटील, डॉ. माने, शिवाजी सरगर, विकास जावीर निसर्गप्रेमी युवक उपस्थित होते.


0 Comments