google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये दुपारी चार पर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार , जिल्हाधिकारी यांचा आदेश जारी..काय सुरु ... काय बंद पाहा

Breaking News

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये दुपारी चार पर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार , जिल्हाधिकारी यांचा आदेश जारी..काय सुरु ... काय बंद पाहा

 सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये दुपारी चार पर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार , जिल्हाधिकारी यांचा आदेश जारी..काय सुरु ... काय बंद पाहा


सोलापूर -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे . सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवार उद्या दि .७ जूनपासून निर्बंध शिथिल होत असून या संदर्भात दि .६ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत . अत्यावश्यक सेवेतील दुकान रोज सुरु राहतील तर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील . शनिवार व रविवारी ती बंद असतील .


सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील तर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. विवाहासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी असणार आहे.
रेस्टॉरंट संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवा देण्यास अनुमती आहे. सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंगसाठी दरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत तर पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगी देण्यात आली आहे.संसर्गदर, ऑक्सिजन बेड यावर राज्यात पाच स्तर करण्यात आले असून त्यानुसार अनलॉक प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरात असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे यासाठी १५ दिवसांची वैधता आहे. अशा अहवालाशिवाय दुकान, व्यवसाय सुरु करता येणार नाही. असे जिल्हाधिकारी यांच्या काढलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments