जामिनावर सुटलेल्या खाजगी सावकाराने कर्जदारास पेट्रोल टाकून जिवंत जाळले सोलापुरात उपचारा दरम्यान मृत्यू
राज्यात बेकायदा व जुलमी सावकाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सावकारीतून मिळालेल्या श्रीमंतीतून राजकीय व सामाजिक वर्तुळात सडकछाप तरुणांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा करत आपल्या परिसरातील मोठ्या नेतेमंडळीचा वरदहस्त प्राप्त करून घेण्यातही अनेकजण यशस्वी झाले आहेत.सावकारी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालाच तर लगेच जमीन मिळतो अशी भावना या अवैध सावकारांमध्ये वाढीस लागली असून जमिनीवर सुटका होताच किंग इज बॅक च्या पोस्टमुळे असे जुलमी व बेकायदा सावकार पुन्हा जनमानसात मान उंचावून वावरताना दिसून येतात.राज्याच्या गृहमंत्री पदाची सूत्रे स्व.आर.आर.पाटील यांच्या हाती असताना त्यांनी खाजगी सावकरांना कोपरा पासून ढोपरा पर्यंत सोलून काढा असे उघड आदेश पोलीस प्रशासनास दिले होते.मात्र आता राज्यात पुन्हा खाजगी जुलमी सावकारी आपला बीभत्स चेहरा दाखवीत असून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे खून प्रकरणात जमिनीवर सुटलेल्या सावकाराने एका तरुणास १३ दिवस डांबून ठेवल्यानंतर त्याचा पेट्रोल टाकून जाळून खून केला आहे.शिवराम कांतीलाल हेगडे ( वय २७ , रा . निमगाव केतकी , ता.इंदापूर ) असे मयताचे नाव असून त्यास सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र ९ ० भाजल्यामूळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . या प्रकरणी नवनाथ हणुमंत राऊत ( वय ३२ , रा.निमगाव केतकी , ता.इंदापूर ) व सोमनाथ भिमराव जळक ( वय ३१ , रा.इंदापूर ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेमुळे जुलमी खाजगी सावकारी बाबत पुन्हा संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे .


0 Comments