google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात पुन्हा एकदा कठोर निबंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे .

Breaking News

राज्यात पुन्हा एकदा कठोर निबंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे .

 राज्यात पुन्हा एकदा कठोर निबंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे . 


संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचे सरकारी आकडेवारीनुसार दिसत होते . आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला . त्यातच आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे . या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आले आहेत . त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत . राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे . तसंच बाजारपेठांमध्येही तुफान गर्दी करताना नागरिक दिसत आहेत . त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निबंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे . बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . राज्य सरकारनं जारी केलेली अनलॉकची पाच टप्प्यातील पद्धतीत बदल करण्यात येणार आहे . तसंच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील , असेही संकेत देण्यात आले आहेत .कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता . मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय . राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळलेत . त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे . त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे . कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे . सध्याच्या अनलॉक पद्धतीत राज्य सरकारकडून बदल करण्यात येईल . नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी नियमांत अधिक कठोरता आणून अत्यावश्यक दुकानं वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्याची शक्यता आहे . येत्या दोन दिवसात याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . 

Post a Comment

0 Comments