google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ! ' मॉन्सून एक्सप्रेस ' सुसाट ; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

Breaking News

मोठी बातमी ! ' मॉन्सून एक्सप्रेस ' सुसाट ; कोकणासह सोलापूरपर्यंत मारली मजल

 पुणे : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे .


नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे . दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे . ३ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती .आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे . हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण , ७ जून , कोल्हापूर ९ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होत असते . यंदा मात्र , मॉन्सून एक्सप्रेस सुसाट सुटली आहे . तिने निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे . गेल्या काही वर्षात मॉन्सूनचे इतक्या लवकर प्रथमच आगमन होत आहे





Post a Comment

0 Comments