पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली २ व्यक्तींना ताब्यात घेत १ कोटी ३३ लाख रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले होते . थर्टी फस्टच्या आयोजित पाऱ्यांना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते ,
असे त्यावेळी सांगितले जात होते . गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला . अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई न करता त्यांना काही दिवस पुणे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे .या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलीस ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे . अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन झाले आहे .


0 Comments