सांगोला ( प्रतिनिधी ) : - स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरून ५० हजार चोरी प्रकरणी पोलिसांनी एक तासात छडा लावून स्वप्निल घुले यास ताब्यात घेऊन चोरलेले ५० हजार हस्तगत केले असल्याची माहिती पो.नि. सुहास जगताप यांनी दिली .
याबाबत अधिक माहिती अशी अरविंद आगतराव नलवडे रा शिरभावी ता सांगोला यांनी अज्ञात चोरट्याने खिशात ठेवलेले ५० हजार रु हातचलाखीने लंपास केल्याबाबत गुरुवार दि ३ जून रोजी पोलिसात गुन्हा दाखल केला होता . पो . नि . सुहास जगताप यांनी या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. नागेश यमगर व पो कॉ बाबासाहेब पाटील यांचेकडे दिला . स.पो.नि. यमगर व पाटील यांनी नलवडे यांच्याकडून हकीकत ऐकू न घेतली व तपासासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सांगोला येथून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाची दिशा स्पष्ट केली . यमगर व सहकारी पाटील यांनी संशयावरून सांगोला शहरातील स्वप्निल घुले यास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता राजश्री स्वप्निल घुले याने चोरीची कबुली दिली व चोरलेले ५० हजार पोलिसांकडे सुपूर्द केले . या चोरीचा तपास पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते , उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर , पो कॉ बाबासाहेब पाटील यांनी गुन्हा नोंद ल्यापासून अवघ्या तासाभरात आरोपीस जेरबंद केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे .


1 Comments
Good job
ReplyDelete