पर्यावरण दिन व वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न
सांगोला/प्रतिनिधी :काल सांगोला शहरामध्ये पर्यावरण दिनानिमित्त तसेच मा. नगरसेवक तायाप्पा माने व शेखर गडहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त एखतपूर रोड येथील आ. क्र. 46 बगीचा मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर गोंधळ गल्ली याठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक आनंदा(भाऊ) माने, माजी नगरसेवक माऊली तेली, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर, माजी अध्यक्ष बाबू गावडे, अमोल लऊळकर, देवा गावडे, दिलीप जानकर, गणेश शिर्के, राजीव शिर्के, आरिफ मुलाणी, महादेव पारसे, आसिफ मुजावर, बंडू जानकर, नितीन जानकर, प्रशांत पारसे, भागवत राऊत आदी उपस्थित होते.




0 Comments