google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यात सातशे गावात शाळा सुरू होणार

Breaking News

जिल्ह्यात सातशे गावात शाळा सुरू होणार

 जिल्ह्यात सातशे गावात शाळा सुरू होणार 


सोलापूर : माझे गाव , कोरोनामुक्त गाव ' अभियानांतर्गत जिल्ह्यातील सातशे गावे कोरोनामुक्त झाली आहेत . त्यामुळे या गावांमध्ये शाळा सुरू करण्यास हरकत नाही . यासाठी राज्य शासनाकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले . ते म्हणाले , कोरोना परिस्थितीमुळे यंदाही शाळेची घंटा वाजलीच नाही.शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहे . मात्र याबाबत अंतिम निर्णय राज्य शासनाकडूनच घेण्यात येणार आहे . स्वामी म्हणाले , ' माझं गाव , कोरोनामुक्त गाव ' अभियानांतर्गत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक गावात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत . या अंतर्गत प्रत्येक गावात कोव्हिड केअर सेंटर सुरू करणे , आरोग्य तपासणी शिबिर राबविणे आदी उपक्रम घेण्यात आले आहेत . त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २८ ग्रामपंचायतीपैकी तब्बल सातशे ग्रामपंचायती आता कोरोनामुक्त झाल्या आहेत . या गावात तूर्त कोरोनाचा एकही रुग्ण नाही . त्यामुळे अशा गावात शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव समोर येत आहे . जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडून कोरोनामुक्त झालेल्या गावांची यादी सादर करण्यात आली आहे . राज्य शासनाकडून याबाबत अंतिम निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे . मोबाईल नसलेल्या मुलांसाठी गृहभेटी कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन प्रणालीने शिक्षण घेण्यात येत आहे . ज्या मुलांकडे ऑनलाईन प्रणालीसाठी मोबाईल उपलब्ध नाहीत , अशा मुलांच्या गृहभेटी शिक्षकांनी कराव्यात . त्यांना त्यांच्या घराच्या परिसरातच कोरोना नियम पाळून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा . शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावे , अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली .

Post a Comment

0 Comments