google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 1 जुलैपासून धावणार रेल्वे गाड्या! 'या' प्रवाशांनाच करता येईल प्रवास

Breaking News

1 जुलैपासून धावणार रेल्वे गाड्या! 'या' प्रवाशांनाच करता येईल प्रवास

 1 जुलैपासून धावणार रेल्वे गाड्या! 'या' प्रवाशांनाच करता येईल प्रवास 


सोलापूर विभागातील सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, सोलापूर-हसन एक्स्प्रेस, मुंबई-लातूर, मुंबई-बिदर, शिर्डी-दादर या रेल्वे गाड्या 1 जुलैपासून सुरू होणार आहेत.सोलापूर : कोरोनाची परिस्थिती सावरल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने काही रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये सोलापूर-मुंबई सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेसचाही समावेश आहे. सोलापूर विभागातील एकूण पाच रेल्वे गाड्या 1 जुलैपासून सुरू होणार आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता असल्याने रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांची ऑक्‍सिजन व टेम्प्रचेर लेव्हल तपासली जाणार आहे. तर संशयितांची कोरोना टेस्टही केली जाऊ शकते. परंतु, आरक्षित तिकीटाशिवाय अन्य कोणत्याच प्रवाशाला त्या रेल्वे गाड्यातून प्रवास करता येणार नाही. आरक्षण कन्फर्म न झालेल्या व वेटिंगवरील प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 1 जुलूपासून सुरु होणाऱ्या रेल्वेत सोलापूर-मुंबई सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस, सोलापूर-हसन एक्‍स्प्रेस, मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस, मुंबई-बिदर एक्‍स्प्रेस आणि शिर्डी-दादर एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळला नसल्याने जनरल कोच सुरू करण्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. कोरोना काळात अडचणीत आलेली रेल्वे आता टप्प्याटप्याने सुरू केली जात आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेने नवा उपक्रम सुरू केला. मात्र, लाखो कर्मचाऱ्यांचा पसारा सांभाळणाऱ्या रेल्वेला कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत टाकले. त्यातून आता मार्ग काढताना रेल्वे पूर्वपदावर येईल, असे नियोजन करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.सोलापूर विभागातील पाच एक्‍स्प्रेस सुरू होतीलकोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता 1 जुलैपासून सोलापूर-मुंबई सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस पूर्वीच्या वेळेत धावणार आहे. त्याशिवाय सोलापूर विभागातून धावणाऱ्या आणखी चार एक्‍स्प्रेस गाड्यांचाही त्यात समावेश आहे.1 जुलैपासून सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सुटणाररेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना टेस्ट अथवा लसीकरणाचे बंधन नाहीरेल्वे स्थानकावर संशयितांची होईल कोरोना टेस्ट; प्रत्येकाचे होणार थर्मल स्क्रिनिंगआजारपणात प्रवास नकोच; आरक्षण कन्फर्म झालेल्यांनाच करता येईल प्रवास

Post a Comment

0 Comments