शिव शंभूचा इतिहास मनामनात आणि घराघरात पोहोचलाच पाहिजे- माननीय आमदार शहाजी बापू पाटील
वडु आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष ह.भ.प. आकाश भोंडवे पाटील यांनी आयोजित केलेली शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा 2021 हा खरच आताच्या काळातील स्तुत्य उपक्रम आहे असे वक्तव्य सांगोल्याचे आमदार माननीय ॲड.शहाजीबापू पाटील यांनी केले छत्रपती शिवरायांचा व छत्रपती शंभूराजांचा इतिहास ज्ञात व्हावा, आजच्या तरुणाईच्या मनात ते चैतन्य पुन्हा निर्माण व्हावे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले पुस्तकापासून दूर गेली आहेत स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा मुलांनी व तरुणाईने ऐतिहासिक ज्ञानाकडे वळावे हा स्पर्धेचा हेतू नक्कीच सफल होईल. महाराष्ट्राला एक ऐतिहासिक वारसा आहे, महाराष्ट्राने इतिहास घडवला आहे आणतो शिवशंभुचा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. स्वराज्यात जात, धर्म, पंथ यावरून कधीही भेदभाव झाला नव्हता अन आत्ताच्या पिढीला,समाजाला त्या स्वराज्य विचारांची गरज आहे ते विचार मनामनात पुन्हा ते पेरावेत व हा स्वराज्याचा शिवशंभूचा इतिहास घराघरात पोहचावा व पुन्हा त्या इतिहासाला उजाळा मिळावा. आज ती काळाची गरज बनली आहे आणि त्यासाठीच सर्व लहान तरुण मावळ्यांनी व सर्व जनतेने या स्पर्धेत सहभागी होऊन हे समाज कार्य करण्याचे आवाहन सांगोल्याचे माननीय आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
संपर्क सोलापूर जि.प्रमुख 7057247477
सोलापूर जि प्रसिध्दी प्रमुख 9420642434


0 Comments