google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उल्लेखनीय अधिकारी " सुधाकर मागाडे " यांची प्रशासनाकडून दखल त्यांची तहसीलदारपदी निवड

Breaking News

उल्लेखनीय अधिकारी " सुधाकर मागाडे " यांची प्रशासनाकडून दखल त्यांची तहसीलदारपदी निवड

 सांगोला . मांजरी गावचे सुधाकर मागाडे यांची सुरुवात तलाठी ते तहसीलदारपदी निवड झाल्यामुळे सांगोला मंगळवेढा तालुका व परिसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे . 


जिद्द आणि प्रामाणिक जीवन जगत असताना आपल्या उत्कृष्ट कार्यामुळे सुपरिचित मागाडे भाऊसाहेब यांची कामाची सुरुवात तलाठी म्हणून त्यांनी मोडनिंब येथून सुरुवात केली . नंतर ते मंडल अधिकारी म्हणून त्यांनी पदोन्नती झाली . तेथे ही चांगली सेवा दिल्यानंतर ते सांगोला येथे पुरवठा अधिकारी म्हणून अल्पावधीत लोकप्रिय होते . त्याच्या प्रामाणिकपणे काम सर्वसामान्य जनता सुसंवाद , काम करण्याची पद्धत यामुळे ते जनमानसात आदर होता . सद्या मंगळवेढा येथे नायब तहसीलदार येथे कार्यरत असताना त्यांच्या चिकाटी , अन चिकाटी याची दखल प्रशासन यांनी घेऊन तहसीलदार पदी निवड केली आहे . तरुणाई यांचा आदर्श मुर्तीमंत उदाहरण म्हणजे मागाडे भाऊसाहेब अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे.या निवडीबद्दल सांगोला - मंगळवेढा आणि परिसरातून योग्य निवडीबद्दल कौतुक होत आहे . तलाठी ते तहसीलदार हा आदर्श येथे घेण्यासारखा असे या निमित्ताने सत्कार काल बहूजन क्रांती ते गोरगरीब जनतेचे कैवारी बापूसाहेब ठोकळे यांनी सांगितले यावेळी अमृत उबाळे , बाबासाहेब बनसोडे , चंचल बनसोडे , वैभव भोरकडे , राजाभाऊ मडके , नंदू चंदनशिवे , निकोप ठोकळे , शिवाजी शेजाळ इतर कार्यकर्ते उपस्थितीमध्ये सांगोला येथे सत्कार करण्यात आला व पुढील कारकीर्दस शुभेच्छा देण्यात आल्या .

Post a Comment

0 Comments