शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट
। मुंबई । दि.01 जून । विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस हे पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी जाणार आहेत.स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवारजी यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


0 Comments